ब्रम्हपुरी

    ब्रम्ह्पुरी ते अ-हेर नवरगाव या सहा किलोमीटर रस्त्यांपैकी अंदाजे तिन किलोमीटर चा रस्ता नुकताच डांबरीकरणाने पक्का तयार करण्यात आला. या तयार केलेल्या रस्त्या पैकीच्या काही भागावरुन पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी सतत वाहत असल्यामुळे रस्त्याची उंची वाढवून डांबरीकरण करायला पाहिजे होते जेवढी सिमेंट,कांक्रीट ने तयार केलेल्या रस्त्याची आहे तेवढी ...परंतु रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने कसल्याही प्रकारची उंची न वाढविता जुन्याच रस्त्याचे खोदकाम करून तीच गीट्टी, डांबरीकरणाचे तुकडे रस्त्यावर टाकून आणि त्यावर नविन बारीक गीट्टी टाकून ऊंची न वाढविता डांबरीकरणाने रस्ता तयार केला . या तयार केलेल्या रस्त्याला दोन महिनेही झाले नसतील परंतु आज हा रस्ता जागोजागी फुटलेला दिसत आहे काही ठिकाणी डांबरीकरण ऊखरून पडलेली असून खड्डे पडलेले आहेत , रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत आहे.यावरून हा रस्ता तयार करताना बराच काही सावळा गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे. याचे ज्वलंत उदाहरण या फोटोच्या ,व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर ती योग्य ती कारवाई करून आणि जोपर्यंत रस्त्याचे पक्के बांधकाम होत नाही तोपर्यंत त्यांचा कोणत्याही प्रकारचा बिल न  देता तोच पैसा या रस्त्याला लावावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
  या रस्त्याचे बांधकाम करताना रस्त्याच्या मध्ये मध्ये काही छोटे पूल (कलवट )बांधण्यात आलेले आहेत. हे बांधकाम झाल्यानंतर काम केलेल्या ठिकाणी पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात मोठे दगड अथवा बोल्र्डर टाकून रस्ता बुजवायला पाहिजे होते परंतु  ठेकेदाराने या खड्ड्यांमध्ये माती टाकून आणि त्यावर मामुली मुरूम झाकून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आज या ठिकाणची अशी अवस्था आहे की , या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दोन चाकी ,चार चाकी, जड वाहने यांना त्या खड्ड्यातून आपली वाहने काढताना जीव मुठीत घेऊन आपली वाहने काढावी लागतात.
तरी संबंधित बांधकाम विभागाने याची दखल घेऊन बांधकाम करणाऱ्या ठेकेदारा वरती योग्य ती कारवाई करून अ-हेर नवरगाव ,पिंपळगाव (भोसले) वासीय नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे.....